AO3 वर संग्रह/रसिक-मासिक आयात करण्यासाठी Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) द्वारे जाणे का आवश्यक आहे?

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) आणि Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) साठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे कि कोणत्याही रसिककृतीच्या मूळ निर्मात्यांना पूर्ण श्रेय मिळावे आणि त्यांच्या कामावर त्यांचे शक्य तितके नियंत्रण असावे. Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प)कडे हे सुनिश्चित करण्यासाठी साधने आणि प्रमाणित कार्यपद्धती आहेत की AO3वर त्यांची कामे आयात करण्यापूर्वी आणि नंतर निर्मात्यांशी संपर्क साधण्यासाठी सर्व वाजवी प्रयत्न केले जातील (जेणेकरून त्यांना काय होत आहे याची माहिती असेल, आणि आवश्यक असल्यास आमच्याशी संपर्क साधण्याची संधी मिळेल), सर्व निर्मात्यांना पूर्ण श्रेय दिले जाईल, आणि निर्मात्यांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांची रसिक-कृतीवर त्यांच्या हक्क सांगून घेणे, हटवणे, मुक्त करणे, किंवा बदलणे याची संधी नेहमीच मिळेल.