Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मृत्यु किंवा दुर्बलतेच्या स्थितीत आपल्या रसिककृतींचा सांभाळ करायला कोणाला तरी नियुक्त करण्याची परवानगी देते. स्मारक संग्रहांसाठीची विनंती Open Doors (रसिकमुक्तदार प्रकल्प) तेव्हाच पूर्ण करू शकतात जेव्हा ती विनंती मृत निर्मात्याच्या वारसदार किंवा रसिकवारजदारानी केली असेल. रसिकवारसादर व त्यांना नियुक्त करणे ह्या बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया AO3 वाविप्र वाचून घ्या.
Group: Memorial Archives
मला एका वारलेल्या निर्मात्याच्या रसिककृती स्मारक संकलनाच्या रूपात आयात करून पाहिजेत, पण ना मी त्यांचा वारसदार आहे ना ही मला त्यांचा रसिकवारसदार म्हणून नियुक्त केले गेले आहे. ह्या परस्थितीत, मी काय करू शकतो?
Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प)पाशी स्मारक संग्रहांसाठी विनंती केवळ त्या निर्मात्याचा वारसदार किंवा नियुक्त केलेला रसिकवारसदार करू शकतो. परंतु, जर आपल्याला हवे असेल की एका निर्मात्याचे रसिककृती आयात केले जातील, तर आपण आमच्याशी आमच्या संपर्क पत्राद्वारे संपर्क साधू शकता आणि त्यात त्या निर्मात्याचा वारसदार किंवा नियुक्त केलेल्या रसिकवारसदार बद्दल माहिती असेल तर ती देऊ शकता.
AO3वर एका निर्मात्यासाठी मरणोत्तर कोणते संकलन तयार करण्याचा काही मार्ग आहे का?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह)वर स्मारक संग्रहांद्वारे आपण एका निर्मात्यासाठी मरणोत्तर संकलन तयार करू शकता. हे करण्यासाठी, आपण त्या निर्मात्याचे वारसदार किंवा नियुक्त केलेले रसिकवारसदार असणे गरजेचे आहे. स्मारक संकलनांसाठी कसलीही विनंती थेट आमच्या संपर्क पत्राद्वारे पाठवली जाऊ शकते. आम्हाला हे पत्र मिळाल्यास, आम्ही ह्यासाठीची प्रक्रिया सुरू करू शकू. ह्या प्रक्रियेत आपण व रसिकमुक्तद्वार प्रकल्पाचा एक कोणतातर सदस्य एका समजुतीचा करारनाम्यावर सही करावी लागेल, ज्यात आयात करण्याची प्रक्रिया, स्मारक संकलनाची घोषणा, आणि आपल्यासाठी कृती प्रकाशित करायला एका संग्रहक खात्याचे निर्माण, ह्या सर्व्याच्या अटी रेखित केली असतील.
AO3 स्मारक संग्रह म्हणजे काय?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह)चे स्मारक संग्रह त्या रसिककृतींना पुरालेखित करतात ज्यांचे निर्माते वारले आहेत. हे संग्रह प्रमुखपणे AO3 द्वारे निर्मितित केले जातात. ह्या कामात AO3च्या सहकार्यात वारलेल्या निर्मात्याचे वारसदार किंवा नियुक्त केलेले रसिकवारसदार असतात.
वारल्या नंतर निर्मात्यांच्या वारस्याला जपणे, व हे निश्चित करणे की त्यांच्या कृती उपलब्ध राहतील, हेच ह्या संकलांचं लक्ष्य आहे.